पुन्हा पाऊस आला......!
Like on Facebook
https://www.facebook.com/prematme
पुन्हा पाऊस आला......!
कोरडे माझे अंगण सारे
पाऊस जरी ओला,
तुझी आठवण द्यायला आज
पुन्हा पाऊस आला,
चिंब-चिंब भिजताना
आपण थेंब व्हायचो
पानावरून अलगद निसटत
पानाच्या कुशीत शिरायचो
त्या फुलांचा ओला गंधही, तूच सोबत नेला
तुझी आठवण द्यायला
आज पुन्हा पाऊस आला,
गार वारे अंगावर घेत
आपण शहारल्या वाटेवरून जायचो
तुझ्या पापाण्यावरून ओघळणारे थेंब,
मी अलगद ओंजळीत घ्यायचो
"त्या" ओंजळीत थेंब "ते" च पण स्पर्श तुझा गेला,
तुझी आठवण द्यायला
आज पुन्हा पाऊस आला....
पावसाला चुकवत आपण
कितीदा वाट शोधायचो
वारा झाडांना छेडायचा
आणि पुन्हा आपण भिजायचो
सगळा पाऊस आता डोळ्यात साठलेला,
तुझी आठवण द्यायला
आज पुन्हा पाऊस आला....
दरवर्षी पाऊस येईल आणि
तुला माझी आठवण येईल
भूतकाळाच्या ओघात मी तुला
अलगद घेऊन जाईल...,
हास थोड गालात जर भाव माझा आठवला
तुझी आठवण द्यायला
आज पुन्हा पाऊस आला....
0 comments:
Post a Comment