फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले..



अशाच एका संध्याकाळी
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले...

ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले...

दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो...

हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले...

दिवस तो मग असाच एक
न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला...

फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते...

कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या...

नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही....

.

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments