बघ पडशील माझ्या प्रेमात.....
तू सोडुन गेलीस तेव्हा
फारसे काही जाणवले नाही
जाणवले असेलही पण मी
ते जगासमोर आणले नाही
तूला काय वाटणार ग
माझ्या वेड्या भावनेचं
कारण तू ठेवलं होतं
नातं माझ्याशी फक्त मैत्रीचं
मीच होतो वेडा
पडलो तुझ्या प्रेमात
तू एक दिवस होशील
माझी होतो या भ्रमात
पण आजही स्वप्नी
वाटतय तू मला मिळणार
कारण स्वप्नात जगण्याची
मजा तूला नाही ग कळणार
तू मैत्रिच नातही तोड्लं
त्याचं कारण मला माहीती आहे
खरं तर तुला माझ्या प्रेमात
पडण्याची तूला भिती आहे
.
0 comments:
Post a Comment