काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....
काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....
त्रास हा आपल्या जन्माचा होतो हा आईवर,
खोट वाटत असेल तर,विचारा तुमच्या आईला,
किती झाला त्रास तुमच्या जन्माचा........
त्रास हा आपल्या जन्माचा होतो हा आईवर,
खोट वाटत असेल तर,विचारा तुमच्या आईला,
किती झाला त्रास तुमच्या जन्माचा........
नाही सोडले तिने इतरांसारखे नदीच्या किना-यावर,
घेऊनी कडेवर, खांदयावर,
शिकवल कस चालायच हया,आयुष्याच्या वाटेवर,
बोलली तु जा,आहे मी पाठीशी, या जीवनाच्या वाटेवर......
धरुनी हात , शिकवली अ-आ-ई पानावर,
केली मस्ती-आली सुस्ती तर चटके दिले या पाठीवर,
जरी चटके दिले तिने पाठीवर तरी , त्रास होतो तिलाच ,
आहे स्वप्न तिचे, माझ्या मुलाने नाव कोराव जगाच्या पाठीवर.....
पण,झालो आपण मोठे की फ़ुटतात शिंग-डोक्यावर,
नाही राहत आपल प्रेम आपल्या आई-वडिलांवर,
राहते ते फ़्कत आजुबाजुच्या आणि कालेजच्या मुलींवर,
लाज वाटते कोणी बोलेल तु फ़िरतो अजुन आई-वडिलांबरोबर,
पण,नाही त्रास होत त्या आईला या मुलाच्या वागण्यावर......
दिल लग्न लावुन,त्यांनी मला माझ्या निवडीवर,
वाटल,मला ते चुक आणि मी बरोबर या माझ्या निर्णयावर,
संसार करुनी दोघ जाऊ या सुरळीत जीवनावर,
पण,सगळ विसकटल जीवन ही माझ्या गणितावर.....
बाळा जातो तर जा,पण जा काळा-वेळेबरोबर,
पण,लक्ष नाही दिले मी तिच्या शब्दावर,
होतो,आता पश्चाताप केलेल्या क्रुत्यावर,
काय,फ़ायदा आता रडुनी तिच्या आठवणीवर,
काय,लिहु मी हया आईच्या मायेवर.....
0 comments:
Post a Comment