कधी ना कधी, कधी ना कधी...
कधी ना कधी, कधी ना कधी …कधी ना कधी....
मी दूर दूर जाताना, इतकेच मनाशी वाटे
अनोळखी या वळणावर, जुळून यावे हे नाते
हा काळोखाचा पदर होईल कधीतरी दूर
स्वप्नांच्या गावी येईल, मग आठवणींचा पूर
समजावतो मी या मना, कधी ना कधी ….
वाटा या बंद सार्या, आसवांना नसे किनारा
ये तू घेऊन आता वादळाचा आवेग सारा
मग विरून जाईल अंतर अन् फुटेल सगळा बांध
कोसळत्या दोन मनांचा जुळेल रेशीम बंध
आठवेल सारे बघ तुला, कधी ना कधी …..
राती सुन्या सुन्या ह्या, दिवसजाळी क्षणाक्षणांना
हाती तुझ्याच आहे मोडलेला हा निवारा
कुठल्याश्या एका वेळी बस वळून पहा तू मागे
दिसतील तुला तेव्हा हे वाटेवर डोळे माझे
परतून येशी तू पुन्हा, कधी ना कधी ….
Movie : Time Please
Singer(s): Swapnil Bandodkar
Music Director(s): Rishikesh Kamerkar
Singer(s): Swapnil Bandodkar
0 comments:
Post a Comment