** राही **
** राही **
कित्ती सहज बोल तुझे पण अर्थ ’आत’ पोहचले नाही
निरोप घेऊनी तू गेला पुढती,पाऊल माझे हलले नाही
रंगलेले सारे डाव अपुले,फिस्कटलेले तू निमूट पाहिले
कोण नियती,कसले प्राक्तन?तू डाव पुन: रचले नाही
होता येईल रे तुला दगड,जखमांनाही शिवता येईल
नेत्रांमधल्या लक्ष सागरी,किनारे मज गवसले नाही
स्वप्नबीजं तू रुजवत गेलास,तरुतळी निवांत निजलास
वणवण माझी रक्तपाऊले,ऊन माथ्यावरले हटले नाही
उदक पसाभर मधुर मीलनाचे,’जपून ठेव’ सांगून गेलास
अंतिम घटकेस,गंगाजल कशी घेऊ हाती?कळले नाही
एके काळचा ’हमराही’ म्हणूनी गेला..’अल्विदा राही’
विरहाचे घट्ट विळखे देही,प्राण जीवात उरले नाही..