अशीही एक रात्र
अशीही एक रात्र यावी
सोबत तुझ्या जी विरून जावी
चांदण्यांच्या विश्वात रमताना
साथ तुझी मला निरंतर मिळावी........
एकाच त्या मृदू रात्री
मोहरलेल्या वृक्षान भोवती
घ्यावेस तू मला मिठीत तुझ्या
विरून जावी माझी सखोल सावली
त्याच कोमल मिठीत तुझ्या
मी पूर्णतः स्वतःस विसरावे
गुलाबी स्पर्शाने तुझ्या मग
अनाहूतपणे तू मला जागे करावे
तू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी
पाउल खुणा मागे सारून
रात्र हि ती विरून जावी..........