रंग माझ्या प्रेमाचे
रंग माझ्या प्रेमाचे, आहेत तरी कोणते,
माय माझी जवळ घेऊन, प्रेमाने मला सांगते,
सौख्य तिचे आणि माझे, आहे फार काळा पुर्वीचे,
कल्पनाविलास न्हवे हा, हे नाते निर्मळ प्रितीचे,
चिंब ओलं करणार्या, पावसाच्या सरींचे,
मनात गारवा निर्माण करणार्या, अमृतमय धारांचे.
मेघांच्या गप्पा-तप्पांतुन, हिचा जन्मं होई,
क्षणात मज भेटावयास, ही पृथ्विवर धावत येई,
स्पर्शसुखाने तिच्या, सारे अंग शहारुन जाई,
काय सांगू तुम्हास मी, या प्रणयाची नवलाई.
मिलनाची या साक्ष द्यायला, ईन्द्रधनुष्य सज्ज होइ,
फुलवुनी पिसारा नाचताना, मोरासही नवा जोम येई,
प्रक्षुबध होउनी वारा, शरीरास झोंबुन जाई,
सारी सृष्टी आम्हा दोघांकडे, हसतमुखाने पाही.
थंडगार तुषार तिचे, ओठांनी माझ्या टिपले,
वेड्यासारखी बरसू लागली, तिचेही देहभान हरपले,
खोल सुप्त विरहाचे, दुःख क्षणात संपले,
पृथेवर माझ्याकरिता जणु, देव-देवताच अवतरले.
असं हे माझ्या प्रेमाचं रहस्य, आईने अचुक ओळखलं,
पण आम्हा दोघांना एकत्र, तिने कधी बरं बघितलं