सांग सख्या रे....येशील तू कधी?
दूर हिरव्या रानात ते...टुमदार घर,
छपरावर कोसळणारी पावसाची सर,
अल्लड वाऱ्यासंगे खिदळणार हि नदी,
सांग सख्या रे....येशील तू कधी?
साथ असेल तुझी तर प्रेमळ वाटतील काटे,
तुझविन सख्या रे....देखावा ही फिका वाटे
रंग त्यात सांग....भरशील कधी ?
सांग सख्या रे....येशील तू कधी?
अंगावर शहारा बेभान करेल कधी ?
दूरचा चंद्र पदरात येईल कधी?
अंगणात माझ्या सांग....चांदणं पसरणार कधी?
सांग सख्या रे....येशील तू कधी?
बोलून मला चिंब भिजवशील कधी?
नजरेत लाज माझ्या.....पाहशील कधी?
हनुवटी धरून झुकत्या पापण्यांत राहशील कधी?
सांग सख्या रे....येशील तू कधी?
शुभ्र घोड्यावर सवार राजकुमार सजला,
तो नको...निथळ मनाचा दिलदार हवा मजला,
तुज पाहण्यास बघ हि...तरसली सखी
सांग सख्या रे....येशील तू कधी?