कधी तरी असे वाटते कि...
कधी तरी असे वाटते कि life renewकरून पाहावे
आयुष्यात घडलेल्या चुका कधी दुरुस्त करून पाहावे
पण परिस्थिती मागे नाही पाहू देत
पुन्हा आपलाच शोध नव्याने नाही घेत
काल चे अश्रू निरर्थक वाटतात
का त्या शुल्लक कारणाला किंमत दिली
म्हणून स्वतःवर हसतात
काही गोष्टी बदलण्यासारख्या होत्या
पश्चातापाच्या आगीत भस्म होणार्या होत्या
पण मला क्षमा मागताच नाही आली
माझ्या "मी" ने परवानगी दिलीच नाही
खंत एकाच गोष्टीची वाटते कि
का अनुभवातून आपण शिकतो
अनुभव येण्यासाठी का वारंवार चुकतो
अजूनहि चुका होतंच राहणार
प्रयत्न फक्त हेच आहेत कि पुन्हा नव्याने आयुष्य जगणार
शिकलेल्या अनुभवातून हे जाणणार
कि पुन्हा कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही आणणार....
------- प्रेमात मी-------------