एक प्रेम रोगी ...!
आज काल पावसात ओला होऊनही
वरवर भिजतो, आतून मी भिजत नाही
जागत राहतो बेधुंद रात्रीत
जो पर्यंत खिडकीतून दिसणारा शेवटचा दिवा विजत नाही
आज काल मी तुलाच काय
माझा मलाही पुरेसा वेळ देत नाही
तुझं काय घेऊन बसलीस
तुझ्या आठवणीची देखील आठवण मला आता येत नाही
आज काल हसणं तर विसरलो आहेच
पण आता आसवाचे सुद्धा एक हि टीप, मी गाळत नाही
आता तुझ्या आठवणीच काय
सिगरेटचा धूर हि माझं काळीज जाळत नाही
आज काल डिस्कोच्या कर्णकर्कश्य आवाजातही
माझे पाय थिरकत नाहीत
तू अचानक समोर आलीस तरी
माझी नजर परत तुझ्याकडे फिरकत नाही
असा धुंद झालो आहे स्वतःमधेच की
कशासाठीही मी आता त्वेषाने लढत नाही
पीत राहतो संपूर्ण बुडण्यासाठी ग्लासात
पण पाहिजे तशी आता ती हि चढत नाही
लोक म्हणतात वाया गेला आहे
नातेवाईक म्हणतात आमच्यासाठी मेला आहे
तरी मला आता कशाचाच फरक पडत नाही
कळणार कसे कोणाला जो पर्यंत त्यांना हा प्रेमाचा रोग जडत नाही
0 comments:
Post a Comment