तुझी सोबत ....

Like on Facebook
वेड मन माझ आज हट्ट करतय
तुझ्याकडे तुझा थोडा वेळ मागतय

सकाळी उठल्यावर तुलाच पहायच आहे
झोपेतून जागी झाल्यावर
परत तुझ्या कुशीत झोपायच आहे

भर उन्हात तुझ्या सोबत चालायच आहे
चटके बसता उन्हाचे कधी
तुला पदराच्या सावलीत घ्यायच आहे

ऋतु शिवाय पावसाला एकदा बोलवायच आहे
तुझ्यासवे चिम्ब भिजुन
तुझ्या मिठीत विरघलुन जायच आहे

शांत सायंकाळी समुद्र किनारी बसायच आहे
अबोलिच्या फुलानी सजलेला गजरा
तुझ्या हाताने माझ्या केसात माळlयचा आहे

पोर्णिमेच्या रात्रि तुझा हाथ हातात घ्यायचा आहे
चंद्राच्या मंद प्रकाशात चमकणार चांदण
तुझ्या सोबत मोजायच आहे

मन माझ तुझ्याकडे इतकाच वेळ मागत आहे
जीवनाच्या प्रत्येक ऋतुमध्ये मला


तुझ्या सोबत जगायच आहे .............

- पल्लवी पांडुरंग पाटील
https://www.facebook.com/prematme

posted under |

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments