खरच मी प्रेम केलय


खरच मी प्रेम केलय 
तुझ्या बोलण्यावर चालण्यावर 
तुझ्या हसण्यावर गाण्यावर
तुझ्या लाजण्यावर मुरकन्यावर
खरच मी प्रेम केलय
तुझ्या इवल्याशा मनावर………..

तू पण जानलस लगेच
लाजून चूर झालिस तेव्हा
नंतर स्वताच्या अपेक्षा
भराभर मला सांगितल्यास जेव्हा

पण तू जेव्हा जवळ येऊन
तुझ ते जीवन नव्हत ते ऐकले
नाराज झालिस तेव्हा खूप
माझ मन तुला जेव्हा भावले

अशीच असते ग जीवनाची रीत
आपल्याला जे मिळत नाही
त्यपाठिच धावतो आपण
आपल्याला रस्ताच काळत नाही

स्वप्न इच्छा आकांक्षा
सगळे भौतिक असते ग
मनात असणार्‍या भावनांची
कदर राखली जात नाही ग

तू जागून काढलेल्या रात्रिन्वर
मी प्रेम केलय खूप मनापासून
आरशात पाहतो तुला मी
नेहमीच तू माझ्या जरी समोर नसून.

मला माहीत आहे
तुझ प्रेम कायम राहणार आहे
जरी तू झाली नाहीस माझी
आपले प्रेम आठवणींवर जगणार आहे

खरच मी प्रेम केलय 
तुझ्या बोलण्यावर चालण्यावर 
तुझ्या हसण्यावर गाण्यावरतुझ्या
लाजण्यावर मुरकन्यावर
खरच मी प्रेम केलय
तुझ्या इवल्याशा मनावर………..

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments