| कधी
विचारही केला नव्हता की असे काही घडेल, |
| सर्वकाही विसरून, मी तिच्यावर
प्रेम करेल, |
| तो काळच तसा होता, ती वेळच तशी
होती, |
| ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा
‘ती’ माझी नव्हती, |
|
| ध्येय नव्हते जीवनाला, कुठला
ध्यासही नव्हता, |
| नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर
विश्वासही नव्हता, |
| अशातच जेव्हा मी पहिल्यांदा
तिला पाहिले, |
| विद्युत् वेगाने माझे काळीज
धडधड्ले, |
|
| तिचं लाजन, तिचं हासन, आणि
बोलके डोळे, |
| काळजाच्या कप्प्यात साठवले
सगळे, |
| मग तिची आठवण होताच मला पड़े
भ्रांत, |
| बोलायचे म्हटले तर, तिचा
स्वाभाव शांत, |
|
| काय कराव तेच कळत नव्हते, |
| कसही करून तिचे मन जिंकायचे
होते, |
| हिम्मत करून शेवटी तिला
प्रेमपत्र लिहिले, |
| विचार करण्यास मुदत म्हणुन काही
दिवस दिले, |
|
| महिना होउन सुद्धा तिचा होकर
नाही आला, |
| होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव
व्याकुळ झाला, |
| समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा
नकार आहे, |
| तिला विसरने हाच एकमात्र उपाय
आहे, |
|
| शेवटी करायला नको ते धाडस मी
केले, |
| होकर आहे की नकार थेट तिलाच
विचारले, |
| मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली,
हे काय आहे..?, |
| ‘तुझ्या एव्हडेच माझे
तुझ्यावर्ती प्रेम आहे, |
|
| एकून तिचे उत्तर, ‘मन’ बेभान
होउन नाचले, |
| अतिआनंदाने डोळ्यात पानी साचले, |
| ध्येय मिळाले जीवनाला, ध्यासही
गावला, |
| माझ्यावरचा विश्वास मी तिच्या
डोळ्यात पहिला, |
|
| आता दीवसही माझा तिच्या नावाने
उगतो, |
| स्वप्नातला चंद्रही तिच्यासाठी
झुरतो, |
| रक्तासारखी माझ्यात ती सामावली
सर्वांगी, |
| साधी, भोळी, अल्लड माझी
प्रेयसी..." |