कशाला जगतोय माहीत नाही
कशाला जगतोय माहीत नाही,
कोणासाठी करतोय माहीत नाही
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..
निस्वार्थ मैत्रीची कधी लाभली साथ नाहि
निथळ प्रेमाचा कधी कुणीच दिला हाथ नाही
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..
पाहण्याआधीच ती तुटतील या
भीतीने कधी स्वप्न पाहीली नाही
पाहीली तरी ती पुर्ण करण्याची आमच्यात जीद्द नाहि
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..
कधी कुणासाठी आमचं मन सांडल नाही
कधी कुणासाठी ते स्वत:शी भांडल नाही
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..
आमच्या मनातल्या इच्छा सागराएवढ्या खोल नाही
म्हणुनच आमच्या आयुष्याला काडीचही मोल नाही
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..
सावल्यांचा हा खेळ अजुन
आम्हाला समजला नाही
जगण्याचा खरा अर्थच अजुन आम्हाला उमगला नाही…..
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..
काही स्वार्थासाठी जगतात,
आम्हाला तर तेही जमत नाही
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..
कधी कधी वाटतं का हा व्यर्थ श्वास विझत नाही…….?
का मनातली जगण्याची आस कुजत नाही…?
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..