-- शब्द माझे मज सोडुन गेले.......
शब्द माझे मज सोडुन गेले
कवीतेचे घर मोडुन गेले
विनवणी केली मी त्यांना
आज मलाच ते रडवून गेले
कश्या करू मी कवीता
झालो मी पुरता रीता
कशी करू मनधरणी
कळेना मज काही आता
मी असा काय गुन्हा केला
शब्दांनी का मज दगा दिला
शब्द बोलले सांगु लागले
तुच तर फसवीलेस आम्हाला
अरे वेड्या शब्द हे आहे हत्यार
जाई काळजाच्या आरपार
तु का विचार केला नाही
चालवले ते शब्द बेसुमार
शब्द बोलता ना तोलुन घे
त्यांना सोबत जगुन घे
वापर त्यांना कुठेही आधी
त्यांच्याही भावना जाणुन घे
कळले मला दु:ख शब्दाचे
नाते जुळले आमचे प्रेमाचे
करतो मी आज कवीता
भान ठेवतो शब्दाच्या वारांचे
शब्दही देती साथ मला
मी ही जपतो त्यांच्या भावनेला
जगतो त्यांच्या समवेत
रंगवीतो शब्दांनी कवीतेला
.
0 comments:
Post a Comment