तू आणि तूच...
तू माझ्या जीवनाचा शिल्पकार
तू मला घडवलेस,
तूच मला वाटलास दिलदार
तू माझे ह्रद्य चोरलेस.
तुझ्यामुळे माझे दुःख झाले कमी
मला वाटले कधींना कधी,
मी तुझ्या दुःखात येईन काम
तुझ्या मनातले आधी सांग.
माझे मन तुला कधी कळणार
जे फक्त तुझेच झाले,
मी तुझे हृद्य कधी चोरणार
जे तुझ्यासाठी परके झाले.
समोर आलास की होतोस परका
त्यावेळी मला वाटते,
की तू मला दिलास धोका
त्यावेळी रडू येते.
मी प्रेम केले
हा माझा होता का गुन्हा?
तू सांग मला
हा गुन्हा करीन मी पुन्हा.
माझ्यात असतील चुका
मी मान्य करते,
तू प्रेम नाही केलेस
तरी मी तुझी पूजा करते.
तुझ्यासमोर आल्यावर
वाटते गुन्हेगारासारखे,
कारण तुला नेहमी वाटते
मी प्रेम करते वेड्यासारखे.
माझी नाही लायकी
तुझ्यावर प्रेम करण्याइतकी,
तू समजू नको मला परकी
तुला विसरण्याइतकी.
तू माझ्यावर प्रेम करावे
अशी नाही जबरदस्ती,
जरी प्रेम केले नाहीस
तरी ठेव माझ्याशी दोस्ती.
- पुष्पलता घाडीगावकर (निधी घाडी )
0 comments:
Post a Comment