---- तू ----
स्वप्नांच्या जगात
वावरणारी अशी मी
एक नवे स्वप्न
दाखविलेस तू.
ते स्वप्नच होते म्हणून
क्षणार्धात तुटले
पण अशी न भरणारी
प्रिय जखम दिलीस तू.
सावलीचा मोह
न सोडणारी अशी मी
माझ्यातील शीतलपणा
जागविलास तू.
ती शीतल सावलीच होती म्हणून
क्षणार्धात हरवली
पण अशी न दिसणारी
प्रिय आशा दाखविलीस तू.
आता माझी सावलीसुद्धा
दररोज तू टाळत असतोस
समाजाच्या चाकोरीतले नियम
पाळून दाखविलेस तू.
पुष्पलता घाडीगावकर (निधी घाडी )
0 comments:
Post a Comment