गोष्ट माझ्या आईची..



गोष्ट माझ्या आईची..

शंभर रुपये कमवायला ती

आठ आठ km पाई पाई जायची
आज सांगतो गोष्ट 
मी माझ्या हिम्मतवान आईची


माझ्या admission साठी तू

convent मध्ये गेली होती
donation ला पैसे नाही
म्हणून अपमानित झाली होती


"माझा मुलगा हुशार आहे 

कोणी तरी या सिस्टर ला सांगा"
पाहिल्या आहेत वाहताना रात्र भर
तुझ्या डोळ्यातून जमुना ,गंगा


दिवाळीत नवीन नसले तरी

स्वच्छ कपडे घालायचे,असे तू सांगितले
स्वाभिमानाने कसे जगायचे
हे आम्हाला शिकवले


चकली चिवडा आवडत नाही

अस मी शेजारी सांगायचो
घरी आल्यावर आपण दोघही
किती ग रडायचो


कौलारू आपल्या घरात पाउस

पूर्ण साम्राज्य निर्माण करायचा
table वर बसून खिन्न डोळे,हसरा चेहरा
कसा मी विसरायचा?


राब राब राबून तू आम्हाला

खूप मोठे केले
सांग आता तुझे
कुठले स्वप्न राहिले


तुझे कुठले हि स्वप्न,इच्छा,आकांक्षा
आता मी पूर्ण करील

नाही जर केले तर
माझ्या आयुष्याला काय अर्थ राहील.....?

posted under |

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments