काळजीने काळजाला जाळताना पाहिले...
काळजीने काळजाला जाळताना पाहिले.
मी सखीला जीव माझा माळताना पाहिले.
लाख दु:खे सोसतो मी ना परंतू हारतो,
मृत्युला मी कैकदा ओशाळताना पाहिले.
राग येतो कायद्याचा सत्य ना तो पाहतो,
रास्त ते आरोफी फेटाळताना पाहिले.
बोललेले आठवेना खोड नित्याची तिची,
मीच वचने रोज माझी पाळताना पाहिले.
पावसाला आज माझी कीव ना येते विठू,
माय माझी हाय रे भेगाळताना पाहिले.
.
0 comments:
Post a Comment