सांग ना रे सख्या तू असा कसा......???

मनातले प्रेम चेह-यावर 
दिसू देत नाहीस,
डोळ्यांनी बोलतोस पण 
ओठांवर येऊ देत नाहीस,
तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू तरी कसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

फोनवर बरेच सांगतोस पण 
प्रेमळ काहीच बोलत नाही 
भेटीच्या तारखा ठरवतोस पण 
भेटणे काही होतच नाही
आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र जसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

तुझ्यावर केलेली कविताही तू 
वाचून नुसता हसतोस,
वाटतं काहीतरी बोलशील पण 
"छान" बोलून गप्प बसतोस
प्रोफेशनल तुझं वागणं तू रोमांटिक होशीलच कसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

आजारी असली जरी मी तरी 
तू एकदाच फोन करतोस,
त्यातही तब्येत विचारायची सोडून 
काहीतरीच बडबडत बसतोस,
आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच मुळी तू तसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

रागावलीच मी तर 
तुला मुळीच करमत नाही,
मझ्याशी बोलल्या शिवाय 
तुलाही राहवत नाही,
समजून घेते मी तुला कारण मला हि तू आवडतोस असा 
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

posted under |

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments