दूर दूर त्या वळनावरती..



दूर दूर त्या वळनावरती, 
भेट आपुली घडली होती..
बघता बघता दोघांचीही,
ह्रदय जणू धडधडली होती..

ह्रदय अशी धडधडली जेव्हा,
डोळ्यांचे जाहले इशारे..
तुझी पापनी अलगद उठता,
तीर मनाला भिडले सारे..

तीर मनाला भिडतान्नाही,
गंध तयाचा दरवळला..
हलके हलके श्वासही माझा,
गंधासोबत विरघळला..

विरघळताना श्वास म्हणाला,
सांग माझी तू होशील का?
चिंब भिजुनी पावसात या,
मिठीत मजला घेशील का?

मिठीत मजला घेशील जेव्हा,
धरणीला या सूर मिळे..
भेट आपुली पाहून राणी,
मंद मंद पाउस जळे..

मंद मंद पाउस जळे हा,
झुरू लागली ही धरती..
प्रीतिचा गुलमोहर फुलला,
दूर दूर...त्या वळनावरती..

posted under |

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments