व्यक्त झालेली मी...
तो असेल माझ्यासाठी
मैत्रीचे स्वस्तिक ,
प्रेमातील नास्तिक मी
होऊन जाईन आस्तिक .
कुठेतरी कधीतरी तुला
डोळे भरून पाहावंसं वाटत.
पापण्या मिटता मिटता
डोळ्यातला पाणी टचकन खाली येत .
आयुष्य कस असत
बाभळीच्या पालवी सारख ,
काट्यातच फुलणार
अन काट्यातच विरणार.
आपल्याला प्रेम करता येते
कोणताच तेढ न ठेवता
मग आपण ते व्यक्त का करत नाही
कोणतेच आढेवेढे न घेता ?
पावसासाठी आम्ही दोघे
होतो एकदम वेडे ,
चिंब आम्ही होऊन जातो
पडताच नक्षत्रांचे सडे .
हल्ली मला भावनांचा
थांगच लागत नाही ,
क्षणभरही मनाला आता
उसंत मिळत नाही .
माहित नाही जगाच्या लेखी
काय अर्थाचा आहे शब्द मन ,
माझ्यासाठी त्याचा अर्थ
समजून घेणा कण नि कण .
उगवत्या सूर्याबरोबर तेजस्वी स्वप्न
पाहतात ते दोघ
रोज नवे क्षण नवे छंद
पडतात त्यांना मोह .
जीवनाचा धागा धरता धरता
मिळाला प्रेमाचा दोरखंड
कदाचित म्हणूनच आपलं प्रेम
राहिला अजरामर अखंड .
0 comments:
Post a Comment