अधुरी भेट आपली..
कॉलर ट्यून हवी होती तीला गालावर खळी,
आवाज ऐकताच खुदकन हसली दातांची फळी.
हळू हळू मैत्री आमची वाढू लागली मस्त,
तिकडे मात्र नेहमीच नेटवर्क येई व्यस्त.
काही दिवसांनी मैत्री आमची थोडा वेळ थांबली,
थोड्या विश्रांती नंतर खूप चांगली चालली.
एकदा ती फोनवर मला एवढ काही बोलली,
जणू माझी चांबडी तीने केल्यावानी सोलली.
तीला तिच्या बोलण्याच वाटल फारच वाईट,
पण मी देखील घेतली अखेर तिचीच साईट.
फोन केला तीने मला मागितली माझी माफी,
मी म्हणालो आपण दोघ पिऊया का ग कॉफी.
ती म्हणाली मला तू एक तारीखला भेट,
मी म्हणालो तीला एवढं का ग लेट.
ती म्हणते चावट करू नकोस घाई,
मी म्हणालो तीला तू तर लाजाळूच बाई.
ती म्हणाली मी ट्रेन ने येईन थेट,
मी म्हटले ट्रेन कशाला विमान आणीन जेट.
ती म्हणाली विमान नको मला वाटते भिती,
मी म्हटले घाबरतेस कशाला वाजलेत किती.
तेव्हा पासून मी तर एकदम वेडापिसा झालो,
कसा बस मी आपला स्टेशन वरती आलो.
ट्रेन मध्ये होती भरमसाट गर्दी,
गर्दी पाहून कि काय माझी पळून गेली सर्दी.
बघता बघता उशीर झाला वाजले होते चार,
ती म्हणाली ( फोनवर ) आज नको नंतर भेटू यार.
एवढ करून त्या दिवशी भेट आमची झालीच नाही,
मी गेलो एवढ्या दूर पण ती मात्र आलीच नाही.
त्या नंतर तिची माझी मैत्री तिथेच तुटली,
मैत्रीची ती ट्रेन माझी कायमस्वरूपी सुटली.
अशी ती माझ्या सामोरी कधी आलीच नाही,
पण मनातून माझ्या ती पाठमोरी कधी झालीच नाही.
अजूनही ती माझ्या मनात एका पाखरा प्रमाणे वसते आहे,
म्हणूनच कि काय या कवितेच्या रुपात तुमच्या सोबत हसते आहे.
आजही आठवण तुझी मी आहे जपली,
स्मरणात राहील कायम अधुरी भेट आपली.
0 comments:
Post a Comment