ओळख....
ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी
ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची
ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी
ओळख.... मग हीच गत असते सा-यांची
ओळख.... विसरलेत सारे आज अर्थच ह्या शब्दाचा
नाममात्र उरले आहेत आज हे शब्द
ओळख.... बनते कधी ही देखील आजी माजी
म्हणतात ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी
ताकाला जाऊन भांडे लपवणारेही बरेच असतात
ईथेही मग उगाच ओळखीचा आव आणतात
स्वार्थ स्वतःचा परमार्थ केल्याचा भासवतात
ओळखीच्याच जोरावर अनेक पदे मिरवतात
मग पुन्हा होतेच गत इथेही तशीच
म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो
माणसाची प्रवृत्ती ही कायम अशीच
सार्थ साधताना मग कोणी येथे उरो अथवा मरो
कशाला करावी पर्वा कोणी कोणाची
जो तो समर्थ येथे घेण्या स्वतःची काळजी
पण इथे सत्ता मात्र सदैव आमची
आव असा जणू हाच वाहतो जगाची काळजी
मग पुन्हा कधी तरी अशीच जाणवते गरज
मग धुंडाळतो आम्ही जुन्या ओळखींना
देतो करून जाणीव मग त्यांनाही त्याची
अन उगाच येते उधाण जुन्याच विनोदांना
ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची
खरं तर जपायची असतात नाती
नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची
0 comments:
Post a Comment