मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो?
पाहताच क्षणी फ़क्त तू नाही,
मी पण प्रेमात पडलो होतो,
मनाची चल-बिचल फ़क्त तू नाही
मी ही अनुभवत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
चोरून पाहण्याचा खेल फ़क्त तू नाही,
मी पण उघडपणे खेलत होतो,
डोळ्यातले तुजे सुवाद फ़क्त तू नाही,
मी पण अप्रत्यक्ष रित्या बोलून साधत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
समोर असण्याची इछा फ़क्त तू नाही,
मी पण देवाकडे मागत होतो,
मधे येणारा दुरावा फ़क्त तू नाही,
मी पण संधि साधून टालत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
पहिल्या प्रेमात फ़क्त तू नाही,
मी पण विचारायला घाबरत होतो,
मनातली भावनेत फ़क्त तू नाही,
मी पण पुरता गुंतत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
उगाच रुसलेले फ़क्त तू नाही,
मी पण खोटे खोटे दाखवत होतो,
दुराव्याच कडू कारल फ़क्त तू नाही,
मी पण कधी कधी मुद्दाम खात होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
प्रेमाची परिभाषा फ़क्त तू नाही
मी पण प्रथमच शिकत होतो,
सावधपणे पाउल फ़क्त तू नाही
मी पण मित्राना विचारून टाकत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
प्रेमाची काबुली फ़क्त तू नाही
मी पण देणार होतो,
पुढाकार घेणारा कोण हे फ़क्त तू नाही
मी पण मनाला विचारत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
बोलायची गरज नाही हे फ़क्त तू नाही
असे मी पण समजत होतो,
दोघांचे प्रेम आहे हे फ़क्त तू नाही
मी पण मनापासून मानत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
0 comments:
Post a Comment