मी जाते आहे आता कायमची....
मी जाते आहे आता कायमची.... गुड बाय !!
असं म्हणून मी बाहेर तर पडले
पण मनात प्रश्न घोंघावतायत....
जायचं कुठे? करायचं काय?
हे असं लपलपणा-या नजरांनी पहाणारं जगं जगू देईल?
प्रश्नांची घोंघावती वादळं
उत्तरांची चलबिचल.......
न उमगणारी कारणं
आठवणींचे उठलेले मोहोळ घेऊन मी निघाले
अखेर निघालेच.........कधीही न परतण्यासाठी
मग सुरु झाला जीवनाचा प्रवास......एकाकी
स्वत:तच आकंठ बुडालेली मी मग भानावर येऊ लागले
आजुबाजूचे जग भोवताली दिसू लागले
मातापित्याविना अनाथ जगणारी छोटी पिल्लं
भरकटलेली तरुणाई
अकाल प्रौढत्व आणि
आधारासाठी धडपड करणारी वृध्दत्वाची काठी
हे राम........!!!
काय लिहिलयस तू यांच्या नशिबात?
हे असं का? कोण करतं हे सार? का होतं??
प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली स्वत:वरच
मग मनात आला एकच प्रश्न?
तू यांच्यातलीच आहेस का?
गरीब......बिचारी?
लोकांचा आधार शोधणारी?
जीवनाच्या पराभवानंतर
आयुष्याचं दान देऊन टाकणारी?
छे........काहीतरीच! अंतरमन उदगारलं
आदीतत्वाचा अंश असणारी तू अशी........हरणारी ???
नाही नाही......... नाहीच मी अशी....गरीब, बिचारी, अबला.
मी स्वयंपूर्ण, मी स्वामीनी, मी सौदामीनी
मी........मी आदिमायेचा अंश.......मी एक स्त्री !!
मी एक स्त्री !!
0 comments:
Post a Comment