तुझी आठवण
विसरून तुला कित्येक वर्ष पालटली
हे आता आठवत नाही
तुला आठवणं सोडून दिलं की त्यांचं येणं बंद झालं
आता हे ही आठवत नाही
मी तुला विसरलोय, मी हे सुद्धा विसरलोय
स्मरणात तसं काहीच नाही .....
पण कुठे झाली ताटातूट, कुठे चुकलो रस्ता
ते मात्र आठवतंय
आणि आठवतंय की,
त्या वळणावर मी उभा होतो बराच काळ
तू गेल्यावर ही, आज सारखाच
शिवाय हे ही आठवतंय की,
या वळणावर माझ्या हातून
दिशा हरवाव्यात तशी तू हरवून गेली
गतकाळाच्या पडद्या आडून तुझी आठवण आली
0 comments:
Post a Comment