क्षणात लपून जाशी
क्षणात लपून जाशी क्षणात दिसून
जसे काही श्रावणाचे सोनसळी उन्ह
किती आलो दूर दूर तरिही अजून
वा-यावर वाहताहे तुझी तुझी धुन
पळतात ढग तुझा सांगावा घेऊन
शोधाया निघालो राणी असे एक गाव
पात्यापात्यावर जिथे दिसे तुझे नाव
जिथे तुझा गंध करी फुलांना तरुण
क्षणात लपून जाशी क्षणात दिसून
जाणवती आसपास कसे तुझे भास
वाटे आता थांबणार अवघा प्रवास
मनातली स्वप्ने सारी येतिल रुजून
क्षणात लपून जाशी क्षणात दिसून
.
0 comments:
Post a Comment