दहीहंडी
सायंकालची वेळ होती.
रघुनाथ रस्त्याने घराकडे चालला होता.
चालून चालून फार थकला होता तो.
दोस्त व नातेवाईकांकडे फिरत होता सकाळपासून,
आता रस्त्याने चालताना साफ निराशा त्याच्या चेहृयावर दिसत होती.
कसल्यातरी काळजिने त्याचे मन ग्लबलून येत होते.
पुढच्या चौकात जरा वेळ बसू असा विचार करून तो चौकाकडे वळला.
चौकमध्ये कसलीतरी गडबड चालू होती,
म्हणून पुढे आला.
बरीच मुळे घोळक्या घोळक्याने उभा होती.
समोरच एक मोठा बोर्ड लावलेला होता.
त्यावर त्या भागातील नामांकित व प्रतिष्ठित मंडळींचे फोटो लावलेले होते.
सर्वात वरच्या भागात मोठ्या अक्षरात लिहिलेले होते.
' पाच लाखांची भव्य दहीहंडी सोहळा'.
हे वाचल्यावर रघुनाथ च्या डोळ्यासमोर काजवे चमकले.
त्याने एका मुलाला विचारले की हे काय आहे,
त्यावर त्या मुलाने उत्तर दिले की दहीहंडी उभरायचे काम चालू आहे.
आम्हाला मदत करणार का असे विचारल्यावर रघुनाथ तयार झाला.
एक दोन तासात दही हांडी उभा झाली.
सहज म्हणून रघुनाथ ने वर पहिले तो काय,
अबब दहीहंडी च्या भोवती शंभर, पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या माळा लावलेल्या होत्या.
कमीत कमी शंभर दोनशे तरी नोटा असतील.
त्यातील एक जरी नॉट मिळाली तरी रघुनाथ ची चिंता मिटणार होती.
मागून एकाने विचारले,"दहीहंडी छान बांधली नाही का!, कशी काय वाटली आमची दहीहंडी!"
रघुनाथ ऊद्गारला," हे तर एकदम पैशाचा पाऊस पहिल्यासारख वाटत आहे."
मनातल्या मनात त्याच्या मनात विचार सुरू झाला की यातली एकजरी नोट मिळाली तरी
माझा आजचा प्रश्न सुटेल व घरी असलेली माझी दोन मुले जेवतील तरी.
त्याच्या डोळ्यासमोर घर व त्याघरात दोन दिवसांपासून उपाशी असलेले
त्याचे कुटुंब दिसले, मुलांचे हाल त्याला बघवत नव्हते.
म्हणून सकाळ पासून सर्वानकडे पैसे मागत् फिरत होता पण कुणी मदत केली नाही.
नोटांची झालर व डोळ्यात पाणी नाही राहीले असे मुलांचे डोळे हेच त्याला आल्टून पालटून दिसत होते.
कसल्या तरी आजाराची साथ आली म्हणून त्याच्या मुकादम् ने काम बंद ठेवले होते.
आठ दिवसांपासून तो असाच भटकत होता.
दहीहंडी साठी मुलांनी रिंगन धरायला चालू केले.
तसा रघुनाथ हडकूळा व चपल शरीर यष्टीचा होता.
मागून कुणा कार्यकर्त्याने त्याला ढकलले व दहीहंडी वर चढण्यास मदत करण्यास सांगितले.
कार्यकर्ते बर्यापैकी धुंद झालेले होते.
अंगात त्रानही राहिलेले नव्हते पण मुलांचा चेहरा आठवून वरती चढण्याचा विचार करू लागला.
त्याच्या मनात एखादी नोट हाती लागलीच तर घरचा प्रश्न सुटेल.
दुसर्या थरावर उभा राहिलेला होता.
त्यावर अजुन तीन थर उभा राहीले.
पायाला काम करताना जखम झाली होती,
पण पैशे नसल्याकारणाने तो दावाखान्यामध्ये सुधा गेलेला नव्हता.
पाय तग धारिना.
एका पायाचा आधार करून कसा बसा तोल सांभाळत वरचा भार अंगावर पेलून होता.
दहीहंडी फुटली जल्लोष झाला.
पैशाच्या माळा खाली आल्या.
गोविंदा नि सगळे पैसे जमा केले.
सत्कार, मानपान झाले.
सगळेच जिकडे तिकडे रवाना झाले.
रघुनाथ सगळे चाचपडून थकला,
शेवटी फाटकी एक नॉट त्याच्या हाताला आली जीचा शून्या उपयोग होता.
लंगडत लंगडत घरी निघाला.
विचार मनात परत आला.
घरी जाऊन काय सांगू त्या लहान जिवा ना.
कृष्णा सारखी दोन बालके,
ना दही ना खायला, काय देऊ त्या दोन जीवांना.
काय देऊ त्या दोन जीवांना.
0 comments:
Post a Comment