मला आठवतात तिच्या सुरुवातीच्या कविता

मला आठवतात तिच्या सुरुवातीच्या कविता..
प्रेमाने फुललेल्या, आणी प्रत्येक खेपेस
नव्याने ओथंबलेल्या
कधी त्यात ती पुर्ण बुडुन जायची
मागे उरायची ती फक्त एक सालस कविता
काही शब्द उराशी कवटाळुन ती कविता फुलत रहायची
जाई-जुई सारखी..
तिला विषय लागायचाच नाही कोणता..
अगदी पाऊस असो किंवा काळा दगड
ती कशावर देखील तितक्याच सहजतेने लिहीत जायची
शब्द तर जणु गुलामच होते तिचे
ती वळवेन तसे वळत रहायचे आणी
मागे उरायची ती फक्त एक सालस कविता
मग एक दिवस त्या कवियेत्रीला एक गीतकार मिळाला
तिच्या शब्दांना नव्याने अर्थ येउ लागला
अता तिवी कविता फक्त सालस राहिली नव्हती
त्या कवितेला मंजुळ पंख फुटले होते
तिची कविता नाचु लागली होती, बागडु लागली होती
अखेर व्हायच तेच झालं
लग्न नावाचा साक्षात्कार..

आता प्रकरण गंभीर आहे
तिला कविता तर सुचतात, पण फोडणीच्या
तडका दिलेल्या आमटीच्या
आणी कधी कधी तर करपलेल्या भाताच्या देखील
फरक तसा काहीच नाही..
तिला तसाही विषय काही लागतच नाही..
सकाळी सार आटोपुन ऑफीसला पोहोचली
की तिला वेळच मिळत नाही कविता वगैरे करायला
मग संध्याकाळची घरी पोहोचली की
त्या संगीतकाराच्या प्रेमात ती ईतकी बुडुन जाते
की तिला वेळच मिळत नाही कविता वगैरे करायला
आणी मी कधी विचारल तर म्हणते..

आता "संसार" हीच कविता झालीये रे..

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments