पाउस आला
विजा कडाडत घेउन आला
दारी माझ्या पाउस आला
वेडे झाले रान सोबती
सुगंध घेउन पाउस आला
सुकली पाने गेली वाहून
अमॄत शिंपीत पाउस आला
पिसार फुलवीत मेघ - नभांचे
गाणे घेउन पाउस आला
चिंब झाहले रानही सगळे
चिंबच मीही नखा-शिखांनी
चिंबच सारे करावयाला
धारा घेउन पाउस आला
0 comments:
Post a Comment