तुझ्या भेटीची ओढ

Like on Facebook https://www.facebook.com/prematme

तुझ्या भेटीची ओढ 

तुझ्या भेटीची ओढ

प्रत्येक वेळी वाढत राहते .. 
सांगशील का रे राजा मला 
असेच नेहमी का होते?

एकमेकांशी बोलताना

क्षण जणू तेथेच गोथावे
आपले बोलणे असेच 
अनंतकाळ चालू रहवे।

हाथात हाथ तुझा असताना

दूर जावेसे वाटत नाही
सहवासाची हि तहान
काही केल्या भागात नाही

वेड मन माझ 

तुझ्या आठवणीत झुरत राहत
तू येउन गेलास तरी
तुझीच वाट पाहत राहत..

आता क्षणाचाही दुरावा 
सहन होत नाही मनाला
आता अशक्य आहे जगणे 
क्षणभरहि तुझ्या विना ….

-रेवा घाडीगावकर…


तुझी सोबत ....

Like on Facebook
वेड मन माझ आज हट्ट करतय
तुझ्याकडे तुझा थोडा वेळ मागतय

सकाळी उठल्यावर तुलाच पहायच आहे
झोपेतून जागी झाल्यावर
परत तुझ्या कुशीत झोपायच आहे

भर उन्हात तुझ्या सोबत चालायच आहे
चटके बसता उन्हाचे कधी
तुला पदराच्या सावलीत घ्यायच आहे

ऋतु शिवाय पावसाला एकदा बोलवायच आहे
तुझ्यासवे चिम्ब भिजुन
तुझ्या मिठीत विरघलुन जायच आहे

शांत सायंकाळी समुद्र किनारी बसायच आहे
अबोलिच्या फुलानी सजलेला गजरा
तुझ्या हाताने माझ्या केसात माळlयचा आहे

पोर्णिमेच्या रात्रि तुझा हाथ हातात घ्यायचा आहे
चंद्राच्या मंद प्रकाशात चमकणार चांदण
तुझ्या सोबत मोजायच आहे

मन माझ तुझ्याकडे इतकाच वेळ मागत आहे
जीवनाच्या प्रत्येक ऋतुमध्ये मला


तुझ्या सोबत जगायच आहे .............

- पल्लवी पांडुरंग पाटील
https://www.facebook.com/prematme

फेसबुकवरील प्रेम




आजकाल माझे इंटरनेट
फक्त फेसबुक झाले आहे 
आणि सारे फेसबुक
तुझ्याभोवती एकवटले आहे
लॉग ऑन केल्यावर
सर्वात आधी तुझा फोटो
त्या बाजूची हिरवी टिकली
दिसताच जीव हरखून जातो
तू हाय केलेला पहिला दिवस
तारीख वेळ ही याद आहे
स्माईली सकट तुझे सारे
उद्गार मला पाठ आहे ..

कधी कधी दिवसभर
खूप वेळा लॉगऑन करूनही
तू येवून गेल्याची
एकही खूण दिसत नाही
तुझ्या चॅट बॉक्स वर
मग ठेवतो काही लिहून
पुन्हा येतो पुन्हा पाहतो
अरे अजुनीही नॉट सिन
हिरमुसने तेव्हा मग 
माझे सारे अस्तित्व होते
अन तो दिवस ती रात्र 
माझे सदैव बिनसत राहते ...

तुझ्याशी मारलेल्या गप्पा
क्वचितच स्पेशल असतात
इकडचे तिकडचे विषय
उगाच मध्ये घुसत असतात
कधी काही सूचक लिहितो
तुझ्या Y ?? ने गडबडतो
सावरा सावर करीत मग
विषय काही बदलतो
तर कधी तुझ्या LOLZ 
शाबासकीने खुलून जातो
शब्द फुलांच्या वर्षावाने
तुला निशब्द करून टाकतो
वेळेचे भान हरवते
जेवणही राहून जाते
उमलून शब्दासमावेत
मन तुजशी एकरूप होते

फेसबुकने या विलक्षण
जादू नक्कीच केली आहे
माझ्या अबोल प्रेमाची
पेरणी काही झाली आहे


विक्रांत प्रभाकर 
Posted on Marathi Kavita

Older Posts
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments