Showing posts with label तुझी वाट पाहतो तेंव्हा. Show all posts
Showing posts with label तुझी वाट पाहतो तेंव्हा. Show all posts

नको ग जाऊ सोडून मला

Like on Facebook https://www.facebook.com/prematme




नको ग जाऊ सोडून मला .............
कसे कसे च होतंय मला ....असंख्य वेदना होतात हृदयला ...
कसले वेड लावून ठेवलय ग हे माज्या जीवाला ...
असे मला एकटे सोडून जाणे पटतंय का ग तुज्या मनाला ...

नको न ग जाऊ सोडून मला ..........
तुज्या असण्याने जगण्याला अर्थ होता ..
मला रडवण्याचा हा तुज खेळ का होता ...
तुज्या नसण्याने जगण्याला अर्थ नव्हता.. 
तुला हे समजावण्याचा माझा व्यर्थ प्रयत्न होता ...

नको ग जाऊ सोडून मला ......
कसे सांगणार त्या स्वप्नांना ..
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना ...
कसे आठवणार त्या दिवसांना ...
एकत्र घालवलेल्या क्षणांना ...

नको ग जाऊ सोडून मला .........
येशील का ग परत माज्यासाठी ...
अतुरोलय मी तुजीच रे शब्द ऐकण्यासाठी ...
ये ग अशी मिठीत ...
जाणार्या या क्षणांना ठेवलाय मुठीत ...
जाणारे पावले gud bye
शब्द नकोयत आठवणीत ...

नको ग जाऊ सोडून मला ........
कोणाची ग नजर लागलीय माज्या नशिबाला ..
खरचं का ग तू नाही येऊ शकत माज्या साथीला ...
तूच हवी आहेस जगण्यासाठी प्रतेक श्वासाला ...
तूच हवी आहेस मरण्यासाठी शेवटच्या श्वासाला ...
नको ग जाऊ सोडून मला ...............

काळजाचे तुकडे..



फुटलेल्या माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट.

काळ सरला, ऋतु बदलले,
तरी मन तुझ्या आठवणींचा माग काही सोडत नाही;
वारे बदलले,दिशा संपल्या,
पण तुझ्याशिवाय या मनाचा, ठाव कुठंही जडत नाही.

निस्तेज ह्या ह्रदयाला,
तुझ्या आठवांचा सुर्य प्रकाश देतो;
निष्पर्ण ह्या जीवनाला,
तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देतो.

तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची;
घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची;
वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव;
एकदाच माझ्या ह्रदयावर घाल, मिलनाचा घाव;
आणि मग, फुटलेल्या माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट..

.

तुझी वाट पाहतो तेंव्हा..

 


तुझी वाट पाहतो तेंव्हा
सांज वेळेची आठवण येते
तुझ्या पाउल खुणांची
किती दाटण होते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
केवड्यांची त्या आठवण येते
मी आणलेल्या गजरयांची
परत एकदा साठवण होते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
आठवले तुझे पैंजण होते
आताही कानावर या
त्यांची ओघवती छन छन येते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
मनात मेघांची अडचण होते
ओल्या चिंब पावसात मग
मन माझे न्हाऊन घेते....

तुझी वाट पाहतो तेंव्हा
चौघड्यांची ती साद येते
तुझ्या लग्नात वाजणाऱ्या सनई संगे
मला तुझ्यापासून दूर नेते....

तुझी वाट पाहतो तेंव्हा
जड माझी पापणी होते
तुझ्या संसारातल्या वसंतान
थोडीशी ती हलकी होते...

खरच तुझी वाट पाहतो तेंव्हा !!!!!
Posted by Picasa

Older Posts Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments