चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतीयाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
करवंदाला चिक आणि आळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

मूठभर जीव अन्‌ हातभर ता‍न
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

भिजे माती आणि उरे अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून पिके सारे शेत
नाजूकशा गुलाबाच्या भवतीने काटे
सरळशा खोडावर फुले दहा फाटे
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

गीत: संदीप खरे.
संगीत: सलिल कुलकर्णी.
स्वर: श्रेया घोषाल.

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog

Recent Comments